जे शक्य नाही तर शब्द का द्यावा ; शरद पवारांचे भाष्य !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २७ ऑक्टोबर २०२३

राज्यातील राजकीय नेत्यांना मराठा समाजाने गावबंदी केली आहे तर दुसरीकडे भाजपचे खासदारांच्या गाड्या फोडल्या आहे तर दुसरीकडे आता शरद पवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा विषयी भाष्य केले आहे.

शरद पवार म्हणाले कि, सरकारच्या भूमिकेमुळेच मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळले आहे जे करणे शक्य नाही त्याचा शब्द केव्हाच देऊ नये. मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला. पण त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. आता सरकारने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असे देखील पवार म्हणाले. शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचे समर्थन करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. शरद पवार म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांनी काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी सुसंवाद केला. त्यांच्यात प्रत्यक्ष काय बोलणे झाले हे मला माहिती नाही. पण जरांगेंनी सरकारला 30 दिवसांचा वेळ दिल्याचे समजले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम