मोदींनी केले शास्त्रज्ञांचे कौतुक ; २३ ऑगस्ट ‘या’ दिवसाने होणार साजरा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ ऑगस्ट २०२३ | चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि नवी इतिहास रचला गेला. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या जमिनीवर उतरला. प्रज्ञान रोव्हर 14 दिवस चंद्रावरील विविध माहिती गोळा करणार आहे. दरम्यान, विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरतानाचा व्हिडीओ लँडरच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे. त्यानंतर देशातील प्रत्येक व्यक्तीने आभार मानत कौतुक केले असून आज या सेंटरमध्ये शास्त्रज्ञांचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहे.

शनिवारी सकाळी इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 टीमच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. येथे त्यांनी 3 घोषणा केल्या. त्यात भारत दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन (नॅशनल स्पेस डे) साजरा करेल. ज्या ठिकाणी लँडर चंद्रावर उतरले, त्या जागेला ‘शिवशक्ती पॉइंट’ असे म्हटले जाईल., ज्या ठिकाणी चांद्रयान-2 च्या पायाचे ठसे आहेत, त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ असे म्हटले जाईल.

45 मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले, ‘मी दक्षिण आफ्रिकेत होतो, त्यानंतर ग्रीसमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्यात गुंतले होते. मात्र कधी कधी असं वाटतं की, मी तुमच्यावर अन्याय करतोय. माझी अधीरता आणि तुम्हाला त्रास. सकाळी-सकाळी आणि एवढा ऑड टाइम. मला तुमच्यासमोर नतमस्तक व्हायचे होते. पण मला तुम्हाला भारतात… (भावुक होत) लवकरात लवकर तुम्हाला भेटायचं होतं…

मोदी म्हणाले, ‘मला तुम्हाला नमन करायचे होते. तुमच्या मेहनतीला सलाम… तुमच्या संयमाला सलाम… तुमच्या जिद्दीला सलाम… तुमच्या चैतन्यला सलाम. तुमच्या आत्म्याला सलाम….चंद्राच्या ज्या भागावर टचडाउन झाले, तो बिंदू आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखला जाईल, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ७.३० वाजता बंगळुरू येथील इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले. येथे ते चांद्रयान-3 टीमच्या शास्त्रज्ञांना भेटले. यादरम्यान त्यांनी टीममधील सर्व शास्त्रज्ञांसोबत ग्रुप फोटोही काढला.

इस्रो कमांड सेंटरमध्ये इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी पीएम मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंतप्रधानांनी सोमनाथ यांना मिठी मारली आणि पाठीवर थाप दिली. त्यांचे यशस्वी चांद्रयान 3 मोहिमेबद्दल अभिनंदन केले. तुम्ही देशाला ज्या उंचीवर नेले आहे ते सामान्य यश नाही. अनंत अवकाशात भारताच्या वैज्ञानिक पराक्रमाचा शंखनाद आहे. तुम्ही देशाला ज्या उंचीवर नेले आहे.. हे काही सामान्य यश नाही. अनंत अवकाशात भारताच्या क्षमतेचा हा शंखनाद आहे. भारत चंद्रावर आहे, चंद्रावर आपला राष्ट्रीय अभिमान आहे. जिथे कोणी गेले नव्हते तिथे आपण गेलो. आपण ते केले जे यापूर्वी कोणी केले नव्हते. हा आजचा भारत, निर्भय भारत, लढणारा भारत आहे. नवा विचार करणारा आणि नव्या पद्धतीने विचार करणारा हा भारत आहे. जो डार्क झोनमध्ये जाऊनही जगात प्रकाशकिरण पसरवतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम