तुमच्या विवाहाची आज बोलणी होणार !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ ऑगस्ट २०२३

मेष : आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवरुन माघार घ्यावी लागेल. आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल.

वृषभ : प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. आर्थिक हानी संभवते. महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमँटिक असणार आहे. खूप पाहुण्यांच्या आगमनाने तुमचा मूड खराब होऊ शकतो.

मिथुन : आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.

कर्क : मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. आर्थिक स्थिती बिघडेल. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा.

सिंह : लघु उद्योगात आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल.

कन्या : जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते. आवाकबाहेर खर्च संभवतो. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. तीर्थस्थानाची यात्रा होऊ शकते. तुमच्या प्रिय लोकांची साथ मिळेल.

तूळ : आर्थिक लाभ संभवतो. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा. चांगले मित्र तुमची कधीच साथ सोडत नाही ही गोष्ट आज तुम्हाला समजेल.

वृश्चिक : तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या कामाला आज दाद मिळेल.

धनु : हमखास यशप्राप्ती होणार. धन लाभ होण्याची शक्यता. मानसिक शांती मिळेल. शेजाऱ्याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल.

मकर : वागण्या-बोलण्यात सावध राहा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. दिवस उत्तम आहे.

कुंभ : मित्रांच्या मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील. अतिखर्च संभवतो. कुटुंबियांना वेळ प्राथमिकतेने वेळ द्या. जोडीदारासोबत छोट्या-छोट्या कारणावरून भांडण होईल. कुठला सिनेमा किंवा नाटक पाहून तुम्हाला आज हिल स्टेशनवर जाण्याची इच्छा होईल.

मीन : नवीन प्रकल्पांसाठी निधी मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. आजच्या दिवशी बाहेरचे भोजन तुमच्या पोटाची स्थिती खराब करू शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम