
मोदींनी सांगितला ‘तो’ किस्सा अन पुणेकरांनी केला जल्लोष !
बातमीदार | १ ऑगस्ट २०२३ | पुणे दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला असून यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात करीत म्हणाले कि, देशाला अनेक महानायक देणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो” आणि पुणेकरांनी जल्लोष केला. ज्या पुरस्काराच्या नावात ‘गंगा’ आहे तो पुरस्कार “नमामि गंगे” यासाठी अर्पण करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी यावेळी केली, महात्मा गांधींनीसुद्धा टिळकांना नव्या भारताचा निर्माता म्हटलं आहे. त्यांनी समाजाला जोडण्यासाठी गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सावाला सुरूवात केली. टिळकांमध्ये युवकांमधील प्रतिभा शोधण्याची जी दिव्य दृष्टी होती याची प्रचिती वीर सावरकरांशी जोडलेल्या एका किस्स्यामध्ये असल्याचं मोदी म्हणाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम