पवारांसह मोदी येणार एकाच व्यासपिठावर ; मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर !
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी यासंबंधी घोषणा केली. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने देशाचे या कार्यक्रमावर लक्ष लागून आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. परंतू गेल्या आठवड्यातच एनसीपीत झालेल्या फुटीनंतर पवार-मोदी प्रथमच एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे खरच हे मान्यवर एकत्र येतील का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक म्हणाले की, मंगळवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. या निमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना दिला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष आहे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम