राज्यात मोदींचं नाणं चालणार नाही ; ठाकरेंचा घणाघात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जुलै २०२३ ।  राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फुट पाडल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीत फुट पाडली शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघताच उद्धव ठाकरे देखील आता विदर्भात दौऱ्यावर निघाले आहे.

आता पक्ष फोडणे नाही तर पळवून नेणाऱ्यांची गॅंग आलेली आहे. खोक्यांचे आमिष दाखवून त्यांनी आमदार, खासदारांना नेले. पण माझ्यासोबत लाखमोलाचा शिवसैनिक आहे. ते बाळासाहेबांचा फोटो देखील चोरत आहे. कारण त्यांना माहित आहे की, आता महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालणार नाही. एवढच काय भाजप तर आता बाजारबुणग्यांचा पक्ष बनला आहे. त्यांच्यातील निष्ठावंतांना तर आता सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. ते विदर्भातील पोहरादेवी येथून सभेला संबोधित करत होते.

आमदार, खासदार गेले तरी चालेल पण माझ्यासोबत दमदार शिवसैनिक उभा आहे. असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. सत्ताधारी प्रचंड माजले आहेत. कारण त्यांच्याकडे पैसा आहे, चोरून नेलेल्या अनेक गोष्टी आहेत. सरकारी यंत्रणांचा वापर करून दडपशाही करू लागले आहेत. पण माझ्या लाखमोलाचा शिवसैनिक ते घेऊ शकत नाही. असे उद्ध ठाकरे यांनी बोलत शिंदेसेनेवरही निशाणा साधला.

माझे नेतृत्व मोदी-शहांनी नाही ठरवायचं, ते माझी मायबाप जनता ठरवेल. माझा पक्ष, चिन्ह देखील ते घेऊ गेले आहेत. पण तरी देखील आजच्या सभेतून त्यांना दिसेल की, जनता कोणासोबत आहे. माझा लढा सुरूच राहणार आहे. पण त्यात तुम्हा जनतेची साथ तितकीच लागणार आहे. चला एकत्र येवून या दडपशाही सरकारला हद्दपार करू, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले.
आजच्या सभेला इतक्या मोठ्या संख्येने लोक येते आले आहेत. पक्ष, चिन्ह जरी हिसकावून घेतले असेल. तरी त्यांच्या सोईनुसार वागणाऱ्या आंधळ्या निवडणूक आयोगाचे डोळे उघडतील. जरी त्याने डोळे उघडले नाही तर आता जनतेचे डोळे उघडले आहे. येत्या निवडणूकात त्यांना समजेल की खरी शिवसेना कोणाची आहे. असा घणाघात ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केला आहे.
पूर्वी मतदानातून सरकार जन्माला यायचे पण आता खोक्यातून सरकार जन्माला यायला लागले आहे. असा घणाघात ठाकरेंनी शिंदेसह भाजपवर केला आहे. पण येत्या काळात आपले सरकार नक्की येईल. पोहरादेवीच्या संस्थानाचे आराखड्यानुसार विकास करण्यासाठी मी कटीबद्द असणार आहे. असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.

काही चाळीस लोकांनी निष्ठेला कलंक लावला आहे. पण तो कलंक आता येत्या निवडणूकीत पुसायचा आहे. त्यासाठी शिवसैनिकांची ताकद गरजेची आहे. मोठ्या ताकदीने तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहाल असा विश्वास मला आहे. तर येत्या काळात नक्कीच निष्ठेला कलंक लावणाऱ्यांना आपण घरचा मार्ग दाखवूया. असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
कोणी प्रश्न विचारायला लागले की, त्याला अडचणीत आणण्याची वृत्ती सद्या सर्वत्र दिसून येत आहे. पण हे लोकशाहीसाठी घातक आहे. आता समान नागरी कायदा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण हा कायदा नेमका काय आहे लोकांना कळू द्या, समान नागरी कायदा कशासाठी पाहिजे याचे महत्त्व सांगा. एकवेळ एक देश- एक कायदा मान्य असेल. पण एक देश एक पक्ष कदापी मान्य होणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी भाजववर केला. भाजपला शिवसेना हवी, पण ठाकरे नको आहे. आता मोदी सरकारकडून समान नागरी कायदा लागू करण्याचे काम सुरू आहे. एकवेळ आम्हाला एक देश- एक कायदा मान्य, पण एक देश एक पक्ष कदापी मान्य होणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम