देशातील जनतेला पेट्रोल-डीझेल पासून मिळणार दिलासा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जून २०२३ ।  देशात वाढत असलेली महागाई कमी होत नसताना सर्वच विरोधक सातत्याने सरकारवर तुटून पडत आहे. पण गेल्या एक वर्षाहूनही अधिक काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कसलाही बदल झालेला नाही. मात्र आता देशातील जनतेला पेट्रोल-डीझेलच्या महागाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

आता ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMC) पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार आहेत. याच वर्षाच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात काही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्या (OMC) ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात 4 ते 5 रुपये प्रति लिटरची कपात करू शकतात.
जेएम फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटीजने एका रिसर्चमध्ये म्हटल्यानुसार, तेल कंपन्यांचे मुल्यांकन व्यवस्थित होताना दिसत आहे. मात्र, इंधन विपणन व्यवसायातील कमाईत मोठी अनिश्चितता आहे. ओपेक प्लसच्या (Opec+) मजबूत किंमतीमुळे पुढील 9 ते 12 महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. तसेच, क्रूड ऑइलची किंमत 80 डॉलर प्रत‍ि बॅरलच्या खाली राहील, असा तेल कंपन्यांना विश्वास आहे. मात्र हे, सरकारकडून होणाऱ्या आर्थिक वर्ष 2023 च्या अंडर-रिकव्हरच्या भरपाईवर अवलंबून आहे.

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात काही मुख्य राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांना ऑगस्टपासून पेट्रोल/डिझेलच्या किंमतीत 4 ते 5 रुपये प्रति लिटरची कपात करण्यास सांगितले जाऊ शकते. कारण, ओएमसीच्या बॅलेन्स शीटमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली असून आर्थिक वर्ष 2024 मध्ये जबरदस्त नफा नोंदवण्याची शक्यता आहे. मात्र, संबंधित रिपोर्टमध्ये संभाव्य कपातीची टाइमलाईन आणि प्रमाणाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, यावर अवलंबून असेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम