सोने खरेदीसाठी महत्वाची वेळ ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जून २०२३ ।  प्रत्येक महिलेसह पुरुषांना सोन्यासह चांदीचे दागिने नेहमी आवडत असतात, ज्यांना खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची असणार आहे. गेल्या सहा दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण दिसून येत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात जवळपास 300 रुपयांची घसरण झाली. एवढेच नाही, तर गेल्या दीड महिन्यात चांदीच्या दरातही 9000 रुपये प्रत‍ि क‍िलोची घसरण झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर 61,000 रुपयांपेक्षा वर पोहोचला होता. याच पद्धतीने चांदीही 77,000 हजार रुपयांच्या वर गेली होती. मात्र आता दोन्ही धातूंच्या किंमतीत घसरण दिसत आहे.

आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी, अर्थात शुक्रवारी मल्‍टी कमोड‍िटी एक्‍सचेन्ज (MCX) आणि सराफा बाजार दोन्हींतही सुस्ती दिसून येत आहे. गेल्या दीड महिन्याचा विचार करता, सोन्याचा दर 3500 रुपयांच्या जवळपास घसरला आहे. चांदीही 68,000 रुपयांवर आली आहे. यात 9000 रुपयांपेक्षाही अधिकची घसरण दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत तेजीने वाढणाऱ्या सोन्या चांदीच्या किंमती तेजीनेच खालीही येत आहेत.

सराफा बाजारातील किंमतीतही शुक्रवारी मोठी घसरण दिसून आली. सराफातील किंमतीसाठी अधिकृत वेबसाइट https://ibjarates.com नुसार 24 कॅरेट सोने जवळपास 300 रुपयांनी घसरून 58380 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर, तर 999 दर्जाची चांदी जवळपास 800 रुपयांनी घसरून 68194 रुपये प्रत‍ि किलोवर दिसून आली. वेबसाइटवरील जारी रेट शिवाय, जीएसटी आणि मेक‍िंग चार्ज देखील द्यावा लागतो. यापूर्वी गुरुवारी चांदी 69009 रुपये प्रत‍ि क‍िलो तर सोने 58654 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम