एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल होणार ३० पेक्षा जास्त विमान !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ नोव्हेबर २०२३

येत्या सहा महिन्यांत एअर इंडियाच्या ताफ्यात ३० पेक्षा जास्त नवीन विमानांचा समावेश करणार आहे. त्याचबरोबर कंपनी ४०० साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्याबरोबरच भारताबाहेर चार नवीन गंतव्य स्थानांसाठी उड्डाणे सुरू करू शकते.

टाटा समूह आपल्या सध्याच्या जाळ्याचा आणि ताफ्याचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. उत्तर अमेरिका, युरोप आणि आग्नेय आशियामध्ये आंतरराष्ट्रीय विस्ताराची योजना आखली आहे. तसेच हिवाळी हंगामाचा एक भाग म्हणून मार्च २०२४ पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय जाळ्यामध्ये ४०० पेक्षा जास्त साप्ताहिक उड्डाणांचा समावेश करण्याचा विचार असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. पुढील सहा महिन्यांत प्रस्तावित नवीन एअरक्राफ्ट इंडक्शनच्या आधारे, एअर इंडियाने अनेक देशांतर्गत मार्गांवर २०० पेक्षा जास्त साप्ताहिक उड्डाणे आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर २०० पेक्षा जास्त साप्ताहिक उड्डाणे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी ८० पेक्षा जास्त साप्ताहिक उड्डाणे आधीच कार्यरत आहेत. एअर इंडियाने यावर्षी एअर बस आणि बोइंगकडून ४७० नवीन विमानांची ऑर्डर दिली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम