पिंपरी पिंपरी विधानसभा क्षेत्रातील ४ हजार पेक्षा जास्त सूचना पंतप्रधान मोदींपर्यंत जाणार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ७ एप्रिल २०२४ | नुकतेच पिंपरी विधानसभेतील कार्यकर्ते व पिंपरी विधानसभेचे प्रमुख अमित गोरखे यांच्या संपर्क अभियानातून निगडी पासून दापोडी पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्यास कुठल्या प्रकारच्या केंद्रीय योजना पिंपरी विधानसभेत हव्या आहेत याची विचारणा नागरिकांकडे केली गेली अस्ता नागरिकांकडून लेखी स्वरूपात याबाबतच्या सूचना घेण्यात आल्या आहेत. किमान तब्बल चार हजार रुपये अधिक सूचना प्राप्त झाल्या असल्याची माहिती अमित गोरखे यांनी दिली.

आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर पिंपरी विधानसभेतील विकासकामासाठी अमित गोरखे यांच्या पुढाकाराने नागरिकांकडून सुचना गोळा करण्यात आल्या. त्या सुचनांची पेटी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.

या प्रसंगी अमित गोरखे यांच्यासमवेत सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, माजी आमदार बाळा भेगडे, प्रशांत ठाकुर, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, अनुप मोरे, बाळासाहेब पाटिल आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम