शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेल्टने बेदम मारहाण करीत रॅगींग केल्याची धक्कादायक घटना समोर!

▪️पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ७ एप्रिल २०२४ | जळगाव शहरातील शिरसोली रोडवर शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात नंदुरबार जिल्ह्यातील एक विद्यार्थी हा तरुण शेवटच्या वर्षाला शिकत असून तो महाबळ परिसराती मोहन नगरात मित्रासोबत राहतो. शुक्रवारी दि. ५ एप्रिल २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास तो विद्यार्थी झोपलेला असतांना त्यांच्या महाविद्यालयातील इन्टरन्सशिप करीत असलेला सिनियरने त्या विद्यार्थ्याला शनिवार ६ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास फोन करुन त्याच्या होस्टेलवर बोलावले. मात्र, पिढीत विद्यार्थी झोपलेला असल्याने तो टाळाटाळ करीत होता. मात्र, काही वेळातच तो सिनियर त्याच्या मित्राला घेवून विद्यार्थ्याला घेण्यासाठी महाबळ परिसरातील त्याच्या रुमवर आला. त्याने विद्यार्थ्याला सोबत घेवून तो राहत असलेल्या शिरसोली रोडवरील संदीपनी हॉस्टेवर नेले. याठिकाणी इन्टर्रन्स शिप करणाऱ्याचे दोन अन्य मित्र देखील होते.

विद्यार्थ्याला घेवून ते रुममध्ये गेल्यानंतर सिनियर त्या सिनियरसह त्याच्या मित्रांनी विद्यार्थ्याला दारु पाजली. त्यानंतर कॉलेजमधील अन्य एक एक विषय उकरुन काढीत त्याला बेल्टने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. महाविद्यालयातील सिनीयर कडून झालेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या पाठीवर पट्ट्यांचे वर्ण उमटले असून तो गंभीर जखमी झाला आहे. चौघांकडून चापटा बुक्क्यांनी आणि बेल्टने मारहाण होत असतांना विद्यार्थ्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जबडा सुजून गेला होता. तसेच मारहाणीत विद्यार्थ्याच्या मांडीवर बेल्टचे टोक लागल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. ते पाहून मारहाण करणाऱ्या चौघांनी धारदार चाकूने विद्यार्थ्याच्या मांडीवर ओरबाडून आणखीन दुखापत करीत त्याचा शारिरीक छळ केल्याची माहिती त्या विद्यार्थ्याने पत्रकारांशी बोलतांना दिली.

मारहाणीतनंतर विद्यार्थ्याला तुझे हातपाय कसे तोडतात ते दाखवतो असे म्हणत त्याला दोन जण दुचाकीवरुन शहरात घेवून गेले. काही वेळ फिरवल्यानंतर त्याला रात्री दोन वाजेच्या सुमारासरुमवर सोडून दिल्याचे पिढीत विद्यार्थ्याने सांगितले. रुमवर आल्यानंतर त्याने घडलेली घटना रुम पार्टनरला सांगितली. त्यांनी रात्रीच महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे घडलेल्या प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे त्यांना आश्वासन दिले. मात्र, यासंदर्भात पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

जळगाव शहरातील शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला खासगी हॉस्टेलवर नेत तरुणाल दारु पाजून, त्याला बेल्टने बेदम मारहाण करीत रॅगींग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना ही शिरसोली रोड परिसरात घडली असून यावेळी तरुणाच्या मांडीवर धारदार चाकूने ओरबडून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर विषयी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम