मोटरसायकलचा अपघातात धुळे येथील एक तरुण मयत तर एक जखमी
अमळनेर (आबिद शेख) अमळनेर येथील धुळे अमळनेर रस्त्यावरील लोंढवे फाट्याजवळ धुळ्याहून अमळनेर ला जडी बुटीचे औषध घ्यायला आलेल्या मोटरसायकल ला मागाहून येणाऱ्या मोटरसायकल ने धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण मयत तर एक जखमी झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत अमळनेर पोलिसांत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिलखा युनूस खा पठाण वय 24 रा.हजार खोली धुळे व त्याचा मित्र रेहान शेख इरफान वय 24 रा.वडजाई रोड धुळे हे दोन्ही मोटरसायकल क्रमांक एम एच 18 ए एल 6255 ने धुळ्याहून अमळनेर ला जडी बुटीचे औषध घेण्यासाठी येत असतांना दुपारी 1 वाजेच्या सुमारास लोंढवे फाट्याजवळ मागावून येणारी मोटरसायकल क्रमांक एम एच 18 बी एन 2755 ने जोरदार धडक दिल्याने दोन्ही जण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले होते.त्यात साहिलखान युनूसखा पठाण यास जबर मार लागल्याने रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांनी त्यास 108 रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मयत घोषित केले.तर मोटरसायकल वर मागे बसलेला रेहान शेख इरफान हा जखमी झाला आहे.तर मोटरसायकला मागावून धडक देणारा मोटरसायकल चालक फरार झाला आहे.मयताच्या चुलत भाऊ अय्युब खान युसूफ खान पठाण यांनी अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून मोटरसायकल चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम