आजचे राशीभविष्य, शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार |१६ सप्टेंबर २०२२ | मेष – जुने करार मार्गी लागतील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गृह सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.

वृषभ – आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल. नवीन योजनेवर काम चालू करावे. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. सामाजिक बांधीलकी जपावी.

मिथुन – छोटे प्रवास घडतील. रचनात्मक कमर करण्यावर भर द्यावा. अति विचारात अडकून पडू नका. वरिष्ठ सहकार्‍यांचे चांगले सहकार्य लाभेल.

कर्क – परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल.

सिंह – आपल्या व्यासंगाचा फायदा होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल.

कन्या – योग्य शिस्तीचा फायदाच होईल. भावंडांशी चर्चेतून मार्ग काढावा. कामाचा ताण जाणवेल. कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल.

तूळ – तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. गोड बोलून कामे साध्य करून घ्याल. काही समस्या चर्चेतून सोडवाव्या. नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल.

वृश्चिक – कामाच्या नवीन संधीचा फायदा घ्या. नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे. उत्साहाने कार्यरत राहाल.

धनू – व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चुकून एखाद्यावर अति विश्वास ठेवाल. जोखीम पत्करल्यास लाभ मिळू शकतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

मकर – घरातील काही खर्च निघतील. तज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

कुंभ – विचारांना योग्य दिशा द्यावी. समाजसेवा करण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी मतभेद दूर होतील.

मीन – व्यापारातील जोखीम सकारात्मक परिणाम देईल. सर्व समस्या टप्याटप्याने सुटतील. जोडीदाराच्या भावनेचा व मतांचा आदर करावा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम