शिंदे गटाच्या खासदाराने तहसीलदाराला दिली तंबी ; व्हिडीओ होतोय व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ ।  राज्यात सध्या शिंदे -फडणवीस, पवार यांचे सरकार असून अनेक भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शिंदे गटाच्या खासदाराने तहसीलदाराला चांगलेच धारेवर धरले असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये खासदाराने थेट तहसीलदाराना तंबी दिली आहे.

काय घडली घटना
शिंदे गटाच्या खासदाराने तहसीलदाराला चांगलेच खडसावले आहे. शेतकऱ्यांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या. त्यांच्या समस्यांकडे कानाडोळा करू नका. तुम्हाला हे कितीवेळा सांगायचं? आता हे इंग्लिशमध्ये सांगू का? अशी तंबी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी तहसीलदाराला दिली आहे. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसमोरच पाटील यांनी तहसीलदाराला चांगलंच झापलं आहे. तहसीलदाराला खडेबोल सुनावत असतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ‘तुमच्या तक्रारी वाढल्या आहेत. लोकांचे प्रश्न सोडवा. तुम्ही काय ब्रिटिशांची औलाद आहात का? अंगात मस्ती येऊ देऊ नका, एका मिनिटात मस्ती उतरवीन’, अशी धमकीवजा तंबी हेमंत पाटील यांनी माहूरच्या तहसीलदारांना दिली आहे. माहूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान ही घटना घडली आहे. हिंगोलीत पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील हे माहुर तालुक्यात आले होते. माहुर दौऱ्यावर असताना माहुरचे तहसीलदार किशोर यादव यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन पाटील यांनी थेट किशोर यादव यांची खरडपट्टी केली आहे.

तहसीलदार फोन उचलत नाहीत, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत नाहीत अशा अनेक तक्रारी नागरिकांनी खासदार हेमंत पाटील यांच्यासमोर केल्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर हेमंत पाटील यांनी किशोर यादव यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. ‘नागरिकांच्या शंभर तक्रारी आल्या आहेत. त्यांची कामे का करत नाहीत? काय ब्रिटीशांची औलाद आहे का? लोकांचे प्रश्न कळत नाहीत का? मस्ती चढलीय का?’असं म्हणत त्यांनी तहसीलदारांना झापलं. त्यानंतर फोन न उचलण्याच्या मुद्यावरूनही खासदार हेमंत पाटील यांनी तहसीलदारांची चांगलीच खरडपट्टी काढली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम