अंबरनाथमध्ये खासदार शिंदे यांचा विजय शिवसैनिकांनी केला साजरा

बातमी शेअर करा...

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा तिसऱ्यांदा मोठ्या मतांनी विजय झाल्यामुळे शहर पूर्व आणि पश्चिमेत शिवसैनिकांनी मिठाई वाटून, ढोल-ताशांच्या तालावर भगवा झेंडा हातात घेऊन फटाके फोडून आनंद साजरा केला. आमदार बालाजी किणीकर, सुनील चौधरी यांनी गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त करत श्रीकांत शिंदे यांना मिठी मारून अभिनंदन केले. या वेळी बालाजी, राजू सावंत, नगराध्यक्ष मीनाल वलांकर यांनी शहरात बॅनर लावून श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदन केले.

येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुनील चौधरी, आमदार बालाजी किणीकर, निखिल चौधरी यांच्या आवाहनावरून शिवसैनिकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा केला. येथे शिवसेना शिंदे गटाच्या शेकडो लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकमेकांना मिठी मारून आनंद साजरा केला. या वेळी पुरुषांसह ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. खासदार म्हणून तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल अभद्र चौधरी, शेख, विकास हेमराज, राहुल हेमराज, सुभाष साळुंखे, सुनील सोनी, उमेश गुजाल, मुकुंद मानिल, रवि सरदेसाई, वसीम शेख, राजू वलांकर, संदीप भराडे, प्रज्ञा वनसाडे, मीनाल गाव इत्यादींनी आनंदोत्सव साजरा करत फटाके फोडून डॉ. श्रीकांत शिंदे यांचे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम