सौ. र. ना. देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

भडगाव तहसील कार्यालय व सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भडगावचे तहसीलदार मुकेश हिवाळे, नायब तहसीलदार नलिनी सुहागीर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दीपक मराठे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तहसीलदार मुकेश हिवाळे म्हणाले की, वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रत्येक नागरिकांने आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवणे आवश्यक आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करीत असून नागरिकांनीसुद्धा शासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत 25 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना साहाय्यक कार्यक्रम अधिकारी व नोडल अधिकारी प्रा. डी. ए. मस्की यांनी केले तर महिला साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एम. गजभिये यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. सी. एस. पाटील, प्रा. एस. ए. कोळी, डॉ. बी. एस. भालेराव, डॉ. सचिन हडोळतीकर, डॉ. अतुल देशमुख, प्रा. शिवाजी पाटील, डॉ. जनार्दन देवरे, डॉ. मंजुषा जाधव, डॉ. गजानन चौधरी, प्रा. ज्योती नन्नवरे, प्रा. प्रवीण देसले,प्रा. मोहनदास महाजन तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम