मुंबई मनपाचे प्रशासन बरखास्त करा : विनायक राऊत यांची मागणी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ । प्रत्येक गोष्टीला मुंबई उच्च न्यायालय हाच मार्ग असेल तर मुंबई मनपाचे प्रशासन बरखास्त करा, जर हायकोर्टाने दोन्ही वेळेस मनपाचे कान टोचले, आणि त्यानंतर त्यांना शहानपणा आला शिवसेनेचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांनी मागणी केली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवार उभा करण्यात येणार आहे. भाजपच्या या उमेदवाराने स्वत:चे डिपॉझिट वाचविण्याचा प्रयत्न करावा, बाकी त्यांच्याबद्दल वक्तव्य करण्यासारखे काहीच नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कसेही वागले तरी चालते, त्यांनी नं.. नाच केला तरीही चालतो, उद्धव ठाकरेंवर ते एकेरी भाषेत टीका करतात तेव्हा ठाकरेंना शिवीगाळ केलेली चालते, त्यांच्या एका आमदाराने दादरमध्ये प्रत्यक्ष फायरिंग केली ती ही चालते, हिंगोलीचे आमदार टाळके फोडा, अडवे करा असे बोलतो हे सर्व चालते.

औरंगाबादमधील एक अडाणी मंत्री अशा प्रकारचे वक्तव्य करतो असे म्हणत संदीपान भुमरेंवर राऊतांनी टीकास्त्र डागले आहे. या सर्व प्रकार सत्ताधाऱ्यांना चालतात, मात्र आम्ही केवळ आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यांचा उपयोग करत काही टीका केली तर काही शोधून 153 नुसार नोटीस बजवायच्या असा पोलिसाचा आणि प्रशासनाचा दुरउपयोग होत आहे. त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. ईडी सरकारने आम्हाला भाषण स्वातंत्र वापरू द्यावे. नारायण राणे आणि पनोती हे समीकरण आहे. ते मुंबई आणि सिंधूदुर्गमध्ये दिसून आले. यापुढेही त्यांच्यावर जर दक्षिण मुंबईची जबाबदारी दिली असेल तर नक्कीच हे समीकरण पुन्हा दिसून येईल असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम