
जोरदार पावसाने टोमॅटोची वर्षांतील विक्रमी वाढ
दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ । राज्यात काही भागात तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव आता वाढू लागल्याचे आहेत. पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी ८८१ प्रति क्रेट्सचा दर देण्यात आला होता.
पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी दि १२ रोजी टोमॅटोला चालू हंगामातील सर्वाधिक ८८१ प्रति क्रेट्सचा दर मिळाल्याने उत्पादकांत समाधानाचे वातावरणात दिसून येत आहे. यामुळे आवक घटल्याने पुढील काही काळात दर आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तवला आहे. गत काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी आवकेत घट झाल्याने टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. बुधवारी पिंपळगाव बाजार समितीत २ लाख ३३ हजार ७२० टोमॅटो क्रेट्सची आवक झाली. २० किलोच्या क्रेट्सला वर्षातील जास्तीत जास्त ८८१, कमीत कमी १०१, तर सरासरी ५३१ बाजारभाव मिळाला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम