मुंबईने केला हिशोब चुकता ; मैदानात पाडला धावांचा पाऊस !
दै. बातमीदार । ४ मे २०२३ । पंजाबने दिलेले 215 धावांचे आव्हान मुंबईने सहा विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. तर सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर मुंबईने पंजाबचा सहा विकेटने पराभव केला. पंजाबचा पराभव करत मुंबईने हिशोब चुकता केला. वानखेडेवर पंजाबने मुंबईचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा मुंबईने मोहालीच्या मैदानावर काढला. मुंबई आणि पंजाब या सामन्यात धावांचा पाऊस पाडला. जवळपास ४० षटकांत ४२५ धावांचा पाऊस पाडला. फलंदाजांनी गोलंदाजांचा समाचार घेत धावांचा पाऊस पाडला. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि मुंबईकडून जोफ्रा आर्चर या आघाडीच्या गोंलदाजांनी सर्वाधिक धावा दिल्या. जोफ्रा आर्चर आणि अर्शदीप सिंह या दोघांनी आयपीएलमधील सर्वात महागडा स्पेल फेकला. दोघांनी आठ षठकात १२२ धावा खर्च केल्या.
अर्शदीपची धुलाई, तिलक वर्माने घेतला बदला – मोहालीच्या मैदानावर अर्शदीप याने महागडी गोलंदाजी केली. मुंबईच्या गोलंदाजांनी अर्शदीप याच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अर्शधीप याने जवळपास १८ च्या सरासरीने प्रति षटक धावा खर्च केल्या. अर्शदीपने ३.५ षटकात तब्बल ६६ धावा दिल्या. पंजाबकडून ही सर्वात महागडा स्पेल ठरला. अर्शदीप याने आतापर्यंतची सर्वात निराशाजनक कामगिरी केली.
Arshdeep Singh finishes with 1/66 in 3.5 overs – his most expensive spell in IPL history.
Comeback strong, Arshdeep! pic.twitter.com/fnSy1bYMoq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 3, 2023
मुंबईच्या फलंदाजांनी अर्शदीप याचा हिशोबही चुकता केला. अर्शदीप याने मुंबईच्या वानखेड स्टेडिअमवर १६ धावा वाचवताना भेदक मारा केला होता. त्यावेळी अर्शदीप याने तिलक वर्मा याचा त्रिफाळा उडवला होता. या सामन्यात तिलक वर्मा याने अर्शदीपचा समाचार घेतला. तिलक वर्मा याने अर्शदीपच्या गोलंदाजीवर तीन चेंडूत १६ धावा काढल्या. यामध्ये दोन षटकार आणि एक चौकार लगावला.
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांची कुटाई केली. प्रत्येक गोलंदाजांचा समाचर घेत २०० धावांचा पल्ला पार केला. पंजाबने विशेषकरुन जोफ्रा आर्चर याचा समाचार घेतला. जोफ्रा आर्चर याने प्रति षटक १४ खर्च केल्या. जोफ्रा आर्चर याने चार षटकात ५६ धावा दिल्या. जोफ्रा आर्चरचा आयपीएलमधील आतापर्यंतचा हा सर्वात महागडा स्पेल आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम