घरात पडला नोटांचा पाऊस ; अधिकारी चक्रावले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ मे २०२३ ।  देशात अनेक ठिकाणी सीबीआय मोठ मोठ्या कारवाई करीत असून आता बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने बड्या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. माजी अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून 38 कोटी 38 लाख जप्त केले आहेत.

या अधिकाऱ्याच्या घरातून आधी 20 कोटी रुपयांचं घबाड सापडलं होतं. आता पुन्हा 18 कोटी रुपयांची पैशांची बंडलं सापडल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्रकुमार गुप्ता यांच्या घरी ही रक्कम सापडली आहे. जलशक्ती मंत्रालांतर्गत पाणी आणि ऊर्जा सल्लागार कंपनीचे ते माजी व्यवस्थापकीय संचालक होते.

दिल्लीसोबतच अनेक ठिकाणी 19 ठिकाणी छापेमारी केली. CBI ने राजेंद्र कुमार गुप्ता यांच्या कुटुंबाविरोधात बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल केला. एवढा पैसा, मौल्यवान वस्तू कुठून आल्या याची चौकशी सध्या सुरू आहे अशी माहिती CBI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम