
‘त्या’ फोनने मुंबई पोलीस अलर्ट ; पाकिस्तानी असल्याचा दावा !
दै. बातमीदार । ८ एप्रिल २०२३ । देशभरात नेहमीच मुंबई पोलीस आपल्या कामामुळे चर्चेत असते. पण आज शुक्रवारी पहाटे मुंबई पोलिसांना सतर्क केले आहे. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात तीन अतिरेकी मुंबईत आल्याचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. या तिघांचा पाकिस्तानी संबंध असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात राजा ठोंगे नावाच्या एका व्यक्तीने फोन करून ही माहिती दिली. त्याने यापैकी एका व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबरही पोलिसांना दिला आहे. या तिघांचाही बेकायदेशीर व्यवसाय असल्याची माहिती राजा यांनी दिली आहे. यापैकी एकाचे नाव मुजीब सय्यद असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या आधारावर पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. दुबईवरुन शुक्रवारी पहाटे हे तीन अतिरेकी भारतात आल्याचं राजा ठोंगे यांनी म्हटलं आहे. तसंच यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम