विजांचे आकांड तांडव : पिकांच्या नुकसानीसह पाच जण जखमी तर शेळी ठार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ एप्रिल २०२३ ।  राज्यात बदलत्या हवामानामुळे सोयगावसह तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळीच्या पाऊस व विजांच्या आकांडतांडव झाल्यामुळे पाच जण वीज कोसळून जखमी झाले तर वेताळवाडी धरण परिसरात एका शेळीचा वीज पडून ठार झाली आहे

सोयगाव सह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी व रात्री उशिरा अवकाळीच्या पाऊस व विजांच्या कडकडाट मध्ये सोयगाव जवळील वेताळवाडी धरण परिसरात शेळी चारत असताना बापू दिलीप सोनवणे(वय ३०) यांच्या शेळी वर वीज कोसळली यामध्ये शेळी ठार झाली असून बापू सोनवणे हे गंभुर रीत्या भाजून जखमी झाले आहे दरम्यान सोयगाव तालुक्यातील वरखेडी (खु) येथे गट क्र-७३ मध्ये शेतात असलेल्या सुरेश राठोड, गौरव राठोड,आश्विन राठोड व अमरसिंह जाधव हे चार जण वीज कोसळून गंभीर जखमी झाले असल्याची खळबळजनक घटना सीयगाव तालुक्यात घडली असून या चौघांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येऊन त्यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

दरम्यान सोयगाव चे वेताळवाडी धरण गलवाडा फर्दापूर,ठाणा वरखेडी(खु) वरखेडी(बु) या भागात अवकाळीच्या पावसाचा जोर अधिक होता दरम्यान तालुक्याला रात्री उशिरा पर्यंत अवकाळीच्या संततधार पावसाने झोडपले होते महसूल च्या प्रशासनाने रात्री उशिरा घटनेचा पंचनामा केला आहे तहसीलदार रमेश जसवंत यांच्यासह आपत्ती निवारण पथक सोयगाव तालुक्यात सज्ज झाले होते उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम यांनी तहसीलदार रमेश जसवंत यांचेकडून घटनेची माहिती घेतली

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम