
मुंबई पोलीस अलर्ट ; मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट !
दै. बातमीदार । २६ एप्रिल २०२३ । देशभरातील अनेकांचा डोळा हा महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईवर गेल्या अनेक दशकापासून आहे. त्यामुळे नेहमीच मुंबईत पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. अशा स्थितीत त्याच दिवशी मुंबईत दहशतवादी घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे, तर मुंबई पोलीस विभाग पूर्ण अलर्ट मोडवर आला आहे.
शिवाजी पार्कवर आयोजित परेड दरम्यान दहशतवादी हल्ला होऊ शकतो. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर परेड होणार आहे. हे लक्षात घेऊन दहशतवाद्यांनी हे ठिकाण आणि तारीख निवडली असल्याची शक्यता आहे.
Mumbai| On Maharashtra Day, a parade is organised in the Shivaji Park ground in Dadar and VIP movement will be there. Flying objects banned in the Jurisdiction of Shivaji Park and section 144 to be issued for 24 hours: Mumbai Police pic.twitter.com/tXRYccGPO1
— ANI (@ANI) April 26, 2023
शिवाजी पार्क परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या कटामुळे शिवाजी पार्कचा परिसर नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून, मुंबई पोलीस विभागाच्या पथकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक संशयित व्यक्तीची चौकशी केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम