
मुंदडा ग्लोबल पुन्हा एकदा नंबर वन… -विद्यार्थ्यांनी अमळनेर च्या धरतीवर प्रत्यक्ष कारगील युद्ध साकारले
अमळनेर(आबिद शेख)मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री एन.टी.मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुल, अमळनेर येथिल विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवा निमीत्त दिनांक १६/०८/२०२२ रोजी नगर परिषदे तर्फे शिवाजी नाटयगृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमात अमळनेर येथील जवळपास १५ ते २० शाळांचा सहभाग होता. त्यात श्री. एन.टी. मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुल अमळनेर यांच्या मार्फत कारगील मधील मेजर विक्रम बत्रा यांच्या जिवनावर अधारीत नाटीका सादर करण्यात आली. सदर नाटीका प्रेक्षक अतिशय मंत्रमुग्ध होवुन बघत होते. प्रत्यक्ष कारगील युध्दात असल्याचे दृष्य सादरीकरण करण्यात आले होते. सदर वेळी अक्षरश: प्रेक्षकांच्या डोळयात पाणी आले सदर नाटीकेस प्रमुख अतिथीं कडून एकुण रु ३०००/- चे रोख बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात आले. सदर वेळी तहसिलदार मा. श्री. मिलींदजी वाघ, पोलिस उपनिरीक्षक मा. श्री. जयपालजी हिरे, अमळनेर नगर परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा.श्री प्रशांत सरोदे व नाटयगृहाचे प्रमुख मा.श्री. संदीप घोरपडे उपस्थित होते. सदर नाटीका शाळेचे शिक्षक श्री निखिल जगदाळे सर यांनी दिग्दर्शकन व लेखन केले होते, हिंदी लेखन सौ. वैशाली जोशी यांनी केले. एडीटींग व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री राकेश शर्मा सर यांनी केले. सदर नाटीका यशस्वी होण्यासाठी सौ. सोनल देसले, सौ.मंजुषा पाटील, श्री सचिन चौधरी, श्री विनोद पाटील, श्री. यज्ञेश पाटील, श्री. पंकज पाटील, सौ. अलका अंटी यांनी परिश्रम घेतले.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाशजी मुंदडा, चेअरपर्सन सौ. छायाभाभी मुंदडा, सहसचिव श्री. योगश मुंदडा, सचिव श्री. अमेय मुंदडा, सौ. दिपीका अमेय मुंदडा, श्री. नरेंद्र मुंदडा, श्री. राकेश मुंदडा, श्री. पंकज मुंदडा, सर्व पदाधिकारी यांनी शाळेचे प्राचार्य श्री. लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्या सौ. विद्या मॅडम, प्रि-प्रायमरी को – ऑडीनेटर सौ. योजना ठक्कर, सर्व शिक्षिक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम