नगरदेवळा दरवाजा पुन्हा उभारून, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वार नामकरण करावे : तालुका अध्यक्ष दिनेश महाजन

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

नगरदेवळा दरवाजा पुन्हा उभारून त्याचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण करा असे निवेदन अखिल भारतीय सेनेच्या वतीने युवा तालुका अध्यक्ष दिनेश महाजन यांनी दिले

निवेदनाद्वारे आपणास सुचित करु इच्छितो सार्वजनीक गणेश उत्सवानिम्मीत बाप्पाच्या मूर्तीला जाण्यासाठी नगरदेवळा दरवाजा तोडण्यात आला होता. आता गणेशउत्सव जाऊन बराच कालावधी लोटला आहे तरी त्यांचे पुन्हा बांधकाम करुन त्याचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वार असे करण्यात यावे व त्याची उंची वाढवून घ्यावी जेणेकरुन पुढील वर्षी मुर्तिस नेआण करण्यास कुठलीही अडचण निर्माण होणार नाही.

तरी मी या अगोदर देखील स्वतः दोन वेळेस निवेदन दिले आहे. तरी या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा व याची दखल घेण्यात यावी. अन्यथा अखिल भारतीय सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम