नगरदेवळा दरवाजाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रवेशदार करावे अन्यथा तिव्र आंदोलन
भडगाव/प्रतिनिधी
अखिल भारतीय सेनेचे युवा तालुका अध्यश दिनेश सतीश महाजन वतीने भडगाव गावातील मेनरोड वरील नगरदेवळा दरवाजाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रवेशदार असे करावे असे निवेदन ८ महिनेअगोदर भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले होते तरी आजपर्यंत त्यासंदर्भात कोणतेही काम पुढे करण्यात आलेले नाही. तरी आपणास या निवेदनाद्वारे आपणास पुनः एकदा निवेदन आम्ही देत आहोत. त्याचा स्वीकार करण्यात यावा. अन्यथा अखिल भारतीय सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम