नायब तहसिलदारांची मोटार सायकल घराजवळून चोरी ;  पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

advt office
बातमी शेअर करा...

भडगाव प्रतिनिधी

शहरातील महसूल कॉलनी (शिवाजी नगर) येथे वास्तव्यास असलेले भडगाव तहसिलचे नायब तहसिलदार राजेंद्र अहिरे यांची होंडा शाईन हि मोटरसायल घरा समोरून दि.२३ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली असून या बाबत भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राजेंद्र नामदेव अहिरे (वय ५६) धंदा-नायब तहसिलदार भडगाव रा.महसुल कॉलनी भडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
भडगांव तहसिल कार्यालय येथे महसुल नायब तहसिलदार म्हणुन नेमणुकिस कार्यरत आहे. तसेच माझ्या मालकिची माझ्याकडे होन्डा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल क्र.एम.एच १९ डि.जे १७७५ ही असुन ती मी वापरत असतो. दि. २३/०३/२३ रोजी रात्री ११.४५ वाजता मी माझ्या भडगांव महसुल कॉलनी जवळ येथील घरासमोरील गेटसमोर माझी वरील होन्डा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल क्र.एम.एच १९ डि.जे – १७७५ ही लॉक करुन लावलेली होती. व मी घरात झोपण्यासाठी गेलो व दि. २४/०३/२३ रोजी सकाळी ०५.०० वा.चे सुमारास उठलो असता मला मोटार सायकल ही जागेवर दिसली नाही म्हणून मी तिचा गल्लीत आजुबाजुला शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. शहरात व परिसरात शोध घेतला ती मिळुन आली नाही. म्हणुन माझी खात्री झाली. ही कुणीतरी अज्ञात चोरट्याने माझ्या संमतीवाचून लबाडीच्या इराद्याने चोरून नेली म्हणून भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम