देशात धावणार ‘नमो भारत’ ; पंतप्रधान मोदींनी दाखविला हिरवा झेंडा !
बातमीदार | २० ऑक्टोबर २०२३
केद्र सरकार देशातील महामार्ग व रेल्वे मार्गावरील मोठी कामे करीत आहे तर आज देशातील पहिल्या रॅपिड ट्रेनची (आरआरटीएस) भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या सत्रातील साहिबाबाद ते दुहाईपर्यंतच्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केलं. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या. शनिवारपासून सामान्य नागरिकांना या ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना नमो भारत नावं देण्यात आलं आहे. केंदीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गुरुवारी याचं नावं बदलण्याची घोषणा केली होती.
मोदींनी २०१९ मध्ये आरआरटीएस प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर या कॉरिडॉरच्या निर्माणासाठी ३० हजार कोटींचा निधी खर्च करण्यात येत आहे. दिल्ली – गाजियाबाद – मेरठ आरआरटीएस हा पहिल्या सत्रातील कॉरिडॉर १७ किमी लांब आहे. त्यामुळे प्रवाशांना गाजियाबादच्या साहिबाबाद ते दुहाईपर्यंत प्रवास करता येणार आहे. ही ट्रेन गाजियाबाद, मुरादनगर आणि मोदीनगरहून एक तासाच्या आत दिल्लीहून मेरठला पोहोचणार आहे. यापुढे दर १५ मिनिटांनी ही ट्रेन उपलब्ध होणार असून पुढच्या स्थानकांचा विस्तार झाल्यांनतर दर ५ मिनिटांच्या अंतराने ट्रेन धावणार आहेत. ताशी १६० किमीच्या वेगाने ही ट्रेन धावणार असून १८० किमी पर्यंत वेग मर्यादा आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम