नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भडगावात स्वच्छता अभियान उपक्रम संपन्न

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

     डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा,ता.अलिबाग (रायगड) यांच्या सौजन्याने डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिनांक १ मार्च २०२३ बुधवार रोजी भडगाव शहरात विविध परिसरात स्वच्छता अभियान प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांच्या मोठ्या उत्साहाने पार पडले.
     सदर अभियानांतर्गत संपूर्ण भडगाव शहरात तसेच परिसरातील जवळपास २५ कि.मी.परिक्षेत्रात ४५८ श्रीसदस्यांनी मिळून सकाळी ७ ते ११ या वेळेत ओला व सुका कचरा मिळून एकूण २३ टन कचरा जमा करुन त्याची योग्य त्याठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी त्यांना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम