नारायण राणे दोन महिन्यांनी तुरुंगात जातील – संजय राऊत

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ५ एप्रिल २०२४ | महाविकास आघाडी म्हणून आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवत आहोत. महायुती म्हणून आमच्यात योग्य समन्वय आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आम्ही काम करतो आहोत. आघाडी धर्म आम्ही सगळेच पाळतो आहोत. काँग्रेसही पाळते आहे आम्हीही पाळतो आहोत. आता कामाला लागले पाहिजे. रामटेकमध्ये आमचा उमेदवार होता तिथे त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काही बोललो का? आता तिथे काम करु आम्ही त्यांचे. काँग्रेसच्या नेत्यांना सांगलीत भेटणार आहोतच. विश्वजीत कदम, विशाल पाटील आमचेच आहेत. आघाडीत प्रत्येक पक्षाला वाटते की हा मतदारसंघ आपल्याकडे रहावा. मात्र आघाडीत जागा इकडे तिकडे होत असतात. भाजपाशी युती असतानाही असे झाले आहे. इथे तीन पक्ष आहेत. विशाल पाटील आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील यापुढे संसदेत कसे जातील याची काळजी शिवसेना घेईल.” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आम्ही आमच्या मतदारसंघात चंद्रहार पाटील यांचा प्रचार करायला आलो आहोत. विशाल पाटील संसदेत कसे जातील ते आम्ही पाहू. विमानतळाचा प्रश्न सोडवू हे मिरजेच्या सभेत चंद्रहार पाटील यांनी सांगितले. असे देखील राऊत यांनी म्हटले.

नारायण राणेंनी वक्तव्य केले आहे की उद्धव ठाकरेंना अटक होणार त्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, “मग नारायण राणे कुठे असतील? दोन महिन्यांत सत्ता आमची येते आहे. त्यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर दोन महिन्यात ते कुठे असतील तिहार जेलमध्ये.” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच नवनीत राणांबाबत मी काहीही बोलणार नाही. काही लोकांविषयी मत न व्यक्त करणेच योग्य असते असेही संजय राऊत म्हटले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम