नवनीत राणांची खासदारकी धोक्यात? अजामीनपात्र वॉरंट

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ ऑक्टोबर २०२२ । भाजपचा व शिंदे गटाचा नेहमी कौतुक करणाऱ्या खा.नवनीत राणा यांची आता खासदारकी धोक्यात येण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. बोगस जात प्रमाणपत्रप्रकरणी खासदार नवनीत राणांविरोधात शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार आहे. मुलूंड पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. आता पोलिस काय कारवाई करणार, याची उत्सुकता आहे.

खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या महिन्यापासून यावर सुनावणी सुरूय. राणा यांनी याप्रकरणी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, तिथेही या कारवाईला स्थगिती मिळाली नाही. या प्रकरणी 7 नोव्हेंबर रोजी पुढची सुनावणी होण्याची शक्यताय. तोपर्यंत राणा यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बोगस आहे, असा दावा करत शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर जून 2021 मध्ये कोर्टाने हे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे म्हणत ते रद्द केले. राणा यांना दोन लाखांचा दंड ठोठावला. त्यानंतर राणा यांनी त्याच महिन्यात या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली.

नवनीत राणा यांच्या वडिलांनी बोगस जात प्रमाणपत्र मिळवले. त्यासाठी यंत्रणेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बोगस दाखला दिला, असा आरोप राणांवर ठेवला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवरही मुलूंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम