अरुणाचल प्रदेशात सैन्याच हेलिकॉप्टर कोसळलं

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ ऑक्टोबर २०२२ । केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी बचाव पथक रवाना झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सियांग जिल्ह्यातील तुतिंय मुख्यालयापासून 25 किलोमिटर दूर अंतरावर असलेल्या सिंगिंग गावामध्ये ही घटना घडली आहे. भारतीय सैन्यातील ध्रुव हेलिकॉप्टर कोसळलं असून या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती समोर आली नाही. अरुणाचलमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची ही पहिली वेळ नाही. याच महिन्याच्या सुरुवातीलाही अरुणाचल प्रदेशातील तमांगजवळ भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. या अपघातात ‘चित्ता’ हेलिकॉप्टरमधील पायलटचा मृत्यू झाला होता. तर दुसरा पायलट जखमी झाला होता. तसेच दोन दिवसांपूर्वी, केदारनाथ येथे हेलीकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम