पवारांच्या मंत्र्याला नक्षलवाद्यांनी दिली धमकी !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २० सप्टेंबर २०२३

राष्ट्रवादीत अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक आमदार सत्तेत सहभागी झाले होते तर नऊ आमदारांना मंत्रीपद मिळाले यातील एक मंत्री म्हणजे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा धमकीचे पत्र पाठविले आहे. नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा परिसरात धमकीचे पत्रक टाकल्याचे माहिती साम टीव्हीला प्राप्त झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथे सुरू असलेल्या लोह प्रकल्पावरून हिवाळी अधिवेशनात आणि त्यांनतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. त्यावेळी आत्राम यांच्या सुरक्षेची काळजी कडेकाेट घेतली जात आहे असे संदीप पाटील (डीआयजी, नागपूर गडचिरोली परिक्षेत्र) यांनी स्पष्ट केले हाेते.

आता पुन्हा एकदा नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा परिसरात पत्रक टाकले असून यात मंत्री आत्राम, त्यांचे जावई आणि काही लोकांना धमकी दिली आहे. गणेशाेत्सव काळात धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील दोन वर्षांपासून सूरजागड येथे लोह खाणीत खनिजांचे उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे. यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशाप्रकारची धमकी देणारे पत्र गट्टा परिसरात आढळून आले. हे पत्रक पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास यांच्या नावे असून यात आत्राम यांचे जावई, त्यांचे भाऊ व कंपनीत कार्यरत काही लोकांची देखील नावे आहेत. वर्षभरात आत्राम यांनी तिसऱ्यांदा नक्षल्यांनी धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पाेलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम