राष्ट्रवादी कुणाची ‘या’ दिवशी होणार सुनावणी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ सप्टेंबर २०२३ | राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिवसेनापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील फूट पडली आहे. यात आता राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात पोहचला आहे. अजित पवार यांच्या गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आप-आपली भूमिका मांडणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट नसल्याचे शरद पवार म्हणत असले तरी हे प्रकरण आता थेट निवडणूक आयोगाकडे गेले आहे. दोन्ही गटाकडून आमचीच राष्ट्रवादी खरी असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फूट पडल्याचे मान्य केले असून दोन्ही गटांना 6 ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावले आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना प्रश्न विचारले. या वेळी अजित पवार यांनी त्यांचीच बाजू खरी असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडणार आहोत. ज्यांना बोलावले ते जाणार आहोत. आमची बाजू कशी उजवी हे आम्ही सांगणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम