विरोधक कारण नसताना बदनाम करताहेत ; अजित पवार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ सप्टेंबर २०२३ 

राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सोबत अजित पवारांनी सत्तेत सहभागी झाल्यावर सर्वच विरोधक एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवारांना ट्रोल करीत असल्याने अजित पवार चांगलेच संतापले आहे. त्यासोबत त्यांनी खंत देखील व्यक्त केली आहे.

अजित पवार म्हणाले कि, सध्या राज्यात वेगवेगळ्या विभागात 1 लाख 50 हजार मुला मुलींची भरती चालू आहे. पण विरोधक चुकीच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि ते काहीपण चुकीच्या बातम्या पसरवतात, असा आरोपही अजित पवार यांनी केला.

पवार म्हणाले की, वेगवेगळ्या विभागात 1 लाख 50 हजार मुला मुलींची भरती चालू आहे. या संदर्भातला आढावा मी घेतला. अनेक ठिकाणी स्टाफ कमी आहे. तो स्टाफ भरण्याची प्रक्रिया चालू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले की, शिक्षण विभागातही आम्ही भरती करणार आहोत. ज्या ठिकाणी शिक्षकांची गरज आहे, त्या ठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांना आपण तात्पुरते घेतल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. भरती तात्काळ करावी लागते नाहीतर काही जण लगेच कोर्टात जातात असेही अजित पवार म्हणाले. राज्यातील विरोधक कारण नसताना आम्हाला बदनाम करण्याचे काम करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राज्य सरकार लवकरच वेगवेगळ्या विभागात 1 लाख 50 हजार मुला मुलींची भरती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ही राज्यातील आतापर्यंत सगळ्यात मोठी भरती असेल, असा दावाही त्यांनी केला. आत्तापर्यंत एवढी मोठी भरती कोणत्याही सरकारच्या काळात झाली नव्हती, असे अजित पवार म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम