अक्षयच्या ‘त्या’ चित्रपटावर नेटकऱ्यांनी टाकला बहिष्कार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ ऑक्टोबर २०२२ । अक्षय कुमारचा आतापर्यंत यावर्षी तीन चित्रपट फ्लॉप झालेले आहे. तरीही चाहते त्याचा चित्रपट पाहण्यास नक्की जातातच. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारला काय झाले आहे माहिती नाही, पण तो गेल्या काही महिन्यांपासून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सम्राट पृथ्वीराज आलेलं अपयश, त्याच्या रक्षाबंधनला प्रेक्षकांनी नाकारणं, सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटांवर नेटकऱ्यांनी टाकलेला बहिष्कार यामुळे अक्षय हा चर्चेत आला होता. आताही तो रामसेतूमुळे ट्रोल होताना दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी ओटीटीवर त्याचा कटपुतली नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

 

यावर्षी अक्षय कुमारचे तीन चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे त्याच्या रामसेतुकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र त्या बऱ्याचअंशी पूर्ण झालेल्या नाहीत. रामसेतूचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून तो चर्चेत आला होता. हॉलीवूडच्या अॅव्हेंजरमधील काही पात्रांची नक्कल या चित्रपटामध्ये करण्यात आल्याची टीका नेटकऱ्यांनी केली होती. त्यामुळे अक्षय हा गेल्या कित्येक दिवस ट्रोल होत होता. आज त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याच्या जोडीला थँक गॉड नावाचा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अक्षयच्या रामसेतूवर अनेकांनी टीका केली आहे. तोच तो विषय फक्त थोडेफार बदल करुन त्याचे सादरीकरण करायचे हा बॉलीवूडचा जुना फंडा असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे, एकानं तर अक्षय गेल्या काही दिवसांत फक्त टॉलीवूडच्या चित्रपटांची कॉपी करण्यात धन्यता मानत असल्याचे म्हटले आहे, यावर्षी अक्षयनं तीन फ्लॉप चित्रपट दिले आहे, त्यामुळे त्याच्या रामसेतूकडून अनेकांना मोठी अपेक्षा होती. जॅकलीन फर्नांडिझ, नुसरत भरुचा, यांनी रामसेतूमध्ये काम केले आहे. अभिषेक शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम