आजचे सूर्यग्रहण ‘या’ राशीसाठी फायदेशीर;जाणून घ्या कोणत्या आहे राशी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ ऑक्टोबर २०२२ । दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सुर्यग्रहण होत आहे. काहीसाठी हे सूर्यग्रहण धोकेदायक तर काहीसाठी फायद्याचे असल्याचे समजते. पण धोकेदायक कुणासाठी व फाद्याचे कुणासाठी हे मात्र कुणीही सांगू शकत नसले तरी पंचागानुसार आज दुपारी 02.29 हे ग्रहण लागणार असून संध्याकाळी 06.32 वाजता हे समाप्त होणार. भारतात मात्र संध्याकाळी 04:22 ग्रहणाला सुरुवात होणार आहे.

सुर्य ग्रहणाचा अनेकांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सुर्य ग्रहणादरम्यान सुतक वैगरे पाळली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की या सुर्य ग्रहणाचा मात्र काही राशींना चांगला फायदा होणार आहे. त्या राशी कोणत्या?

सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांना सूर्यग्रहण लाभदायक असणार आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. नव्या संधी मिळतील.

कर्क : कर्क राशीच्या लोकांना हे सुर्यग्रहण फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक कामात त्यांना यश मिळेल. घर, वाहन खरेदीचा योग असणार. रखडलेली कामे मार्गी लागतील.

धनु : धनु राशीच्या लोकांना या सूर्यग्रहणाचा लाभ होणार आहे. त्यांना पैसे कमावण्याची संधी मिळतील. चांगल्या कामाला सुरवात होईल. गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार.

मीन: मीन राशींच्या लोकांसाठी हे सुर्यग्रहण खूप शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना धनप्राप्ती होणार. गुंतवणूक कराल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम