१ जुलैला एलपीजीचे नवे दर जाहीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जुलै २०२३ ।  देशातील महागाई कुठल्याही प्रमाणात कमी होत असतांना दिसत नाही आहे त्यात आता आज जुलै महिन्याचा पहिला दिवस. आज १ जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, 14.2 किलो एलपीजी सिलेंडर आणि 19 किलो कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, या महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिरच आहेत.

देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये स्वयंपाकघरातील वापरासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1773 रुपये आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत  एलपीजी सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1725 रुपयांवर कायम आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1129 रुपयांवर स्थिर आहे. तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1875.50 रुपये आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, चेन्नईमध्ये एक एलपीजी सिलेंडर 1118.50 रुपयांवर आहे, तर व्यावसायिक सिलेंडर 1937 रुपयांना विकला जात आहे.

सरकारनं 2023 वर्षाच्या सुरुवातीपासूनच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये बऱ्याचदा बदल केले आहेत. गेल्या महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतींत 83 रुपयांनी कपात करण्यात आली होती. तसेच, मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत घट झाली आणि एका सिलेंडरची किंमत 1856.50 रुपयांवर पोहोचली. एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2028 रुपये होती. मार्चमध्ये त्याची किंमत सर्वाधिक 2119.50 रुपये होती. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769 रुपये होती.

गेल्या काही महिन्यांपासून एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरमध्ये 50 रुपयांची वाढ झाली होती. तसेच, त्याआधी गेल्या वर्षी 6 जुलै रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत मार्चपर्यंत 1053 रुपये होती, त्यात 50 रुपयांनी वाढ झाली होती आणि आता घरगुती सिलेंडर 1103 रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम