पेट्रोल-डीझेलचे नवे दर जाहीर : राज्यातील जनतेला धक्का !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ मे २०२३ ।  देशात वाढत्या महागाईने पुन्हा एकदा दुचाकीसह चारचाकीधारकांना धक्का दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. पण, दिलासा देणारी बाब म्हणजे इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. 21 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने वाहन इंधनावरील (पेट्रोल-डिझेल) उत्पादन शुल्क कमी केले असले तरी महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) नवीनतम दर जाहीर केले आहेत. यामध्ये बिहारमध्ये पेट्रोल 25 पैशांनी स्वस्त होऊन 108.90 रुपये आणि डिझेल 23 पैशांनी स्वस्त होऊन 95.57 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर छत्तीसगडमध्येच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 47 पैशांनी घट झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल 1 रुपये आणि डिझेल 78 पैशांनी स्वस्त झाले आहे. मात्र महाराष्ट्रात पेट्रोल 41 पैशांनी वाढून 106.85 रुपये तर डिझेल 93.35 रुपयांवर पोहोचले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोलच्या दरात बदल झाले तर काही भागात पेट्रोल स्वस्त दरात विकले जाणार आहे. यामध्ये अहमदनगर पेट्रोल 106.85 रुपये तर डिझेल 93.35 रुपयांनी विकले जाणार आहे. तर अमरावती पेट्रोल 106.82 रुपये तर डिझेल 93.35 रुपये, कोल्हापूर पेट्रोल 106.75 रुपये तर डिझेल 93.28 रुपये, मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये, नाशिक पेट्रोल 106.12 रुपये तर डिझेल 92.64 रुपये, पुणे 105.91 रुपये तर डिझेल 92.43 रुपये, रायगड 106.14 रुपये तर डिझेल 92.63 रुपये, रत्नागिरी 107.85 रुपये तर डिझेल 94.33 रुपये, ठाणे 105.64 रुपये तर डिझेल 92.24 रुपयांनी विकले जाणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम