आजपासून सोने खरेदीसाठी नवीन नियमांचे करावे लागणार पालन !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ एप्रिल २०२३ ।देशात नुकतेच आजपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली असून यावेळी शासकीय नियमामध्ये अनेक फेरबदल देखील झाल्याचे आढळून येत आहे. आर्थिक वर्षात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आजपासून, सोने खरेदी करतात ग्राहकांना नवीन नियमांचे पालन करावे लागेल.

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना आजपासून सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

4 मार्च 2023 रोजी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आता फक्त 6 क्रमांकाचा हॉलमार्क वैध असेल. पूर्वी 4 अंकी आणि 6 अंकी हॉलमार्कबाबत खूप गोंधळ व्हायचा. ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, केवळ 6 क्रमांकांचे अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. याशिवाय कोणताही दुकानदार दागिने विकू शकणार नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सरकार गेल्या दीड वर्षांपासून देशात बनावट दागिन्यांची विक्री थांबवण्यासाठी नवीन हॉलमार्किंग नियम लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. आता आजपासून ते अनिवार्य करण्यात आले आहे.

HUID क्रमांक काय आहे माहित आहे?
कोणत्याही दागिन्यांची शुद्धता ओळखण्यासाठी त्याला 6 अंकी अल्फान्यूमेरिक कोड दिला जातो. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक म्हणतात. या नंबरद्वारे तुम्हाला या दागिन्यांची सर्व माहिती मिळेल. हा क्रमांक स्कॅन केल्याने ग्राहकांना बनावट सोने आहे की नाही हे ओळखण्यास मदत होते. हे सोन्याच्या शुद्धता प्रमाणपत्रासारखे आहे. 16 जून 2021 पर्यंत हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची विक्री करणे बंधनकारक नव्हते. परंतु 1 जुलै 2021 पासून सरकारने 6 अंकांची HUID पद्धत सुरू केली होती. देशात हॉलमार्किंग सुलभ करण्यासाठी, सरकारने 85 टक्के भागात हॉलमार्किंग केंद्रे उघडली आहेत आणि उर्वरित ठिकाणी काम सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम