
सैराटमधील प्रेम प्रकरणावर आकाशने दिली प्रेमाची कबुली !
दै. बातमीदार । १ एप्रिल २०२३ । चित्रपट क्षेत्रातील प्रत्येक अभिनेता अभिनेत्रीचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत येत असते. तसेच नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर एका रात्रीत लोकप्रिय झाल्याने त्यांचे देखील अनेक प्रेम प्रकरण राज्यात चर्चेत येवू लागले आहे.
महाराष्ट्रात ते दोघे आर्ची-परशा या नावाने ओळखले जातात. सैराटमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आणि त्यांच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही खूप वाढ झाली. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा वारंवार ऐकायला मिळत असते. नुकतेच आकाश ठोसरने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने रिंकू सोबतच्या अफेयरच्या चर्चेवर मौन सोडले.
आकाश ठोसर लवकरच घर बंदुक बिर्याणी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सायली पाटील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी आकाश ठोसरला रिंकू सोबत अफेयरच्या चर्चा ऐकायला मिळतात. तर हे खरं आहे का, असे विचारल्यानंतर आकाश म्हणाला की, असं काही नाही…आम्ही खूप चांगले मित्र आहेत. मित्र भेटतो आणि फिरत असतो. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आकाश रिंकू पेक्षा आर्ची परशा म्हणून लोकांना आम्ही जास्त आवडतो. आमच्यात तसे काही.
खरेतर अशा फोटोंवर फार मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात असल्याने हे दोघे फोटो पोस्ट करून त्याची फक्त मजा घेत असतात. पण हे लोकांचे प्रेम आहे, या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत, हे यश गाठू शकलो आहोत, असे आकाशने याआधी एका मुलाखतीत सांगितले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम