न्यूझीलंडची दमदार हॅट्ट्रिक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ ऑक्टोबर २०२३

कर्णधार केन विल्यमसनने (७८) यशस्वी पुनरागमनासहित डॅरेल मिचेल (८९) सोबत तिसऱ्या गड्यासाठी रचलेल्या शतकी भागीदारीमुळे न्यूझीलंडने विश्वचषकात सलग तिसरा विजय नोंदवला. बांगलादेशला अडीचशेपेक्षा कमी धावसंख्येत रोखल्यानंतर आव्हानचा पाठलाग ४२.५ षटकात करत न्यूझीलंडने ८ गडी व ४३ चेंडू राखून विजयाला गवसणी घातली.

सलामीला उतरलेला राचिन रवींद्र (९) झटपट बाद झाला. डेवॉन कॉन्वे आणि कर्णधार विल्यमसन यांनी त्यानंतर डावाची सूत्रे हातात घेतली. कॉन्वे (४५) अर्धशतकापासून पाच धावा दूर राहिला. कॉन्वे – विल्यमसन जोडीने दुसऱ्या गड्यासाठी त्यांनी ८० धावा जोडल्या. विल्यमसनने त्यानंतर डॅरेल मिचेलला साथीला घेत न्यूझीलंडला सहज विजय मिळवून दिला. ८ चौकार आणि एक षटकार लगावल्यानंतर विल्यमसनने निवृत्तीचा निर्णय घेत मैदान सोडले. अखेरपर्यंत नाबाद राहणाऱ्या मिचेलच्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम