नवविवाहितांना मिळणार केद्र सरकारकडून २ लाखांचे गिफ्ट ; जाणून घ्या सविस्तर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ डिसेंबर २०२२ ।  आयुष्यात लग्न हि एक सामाजिक प्रतिष्ठेची बाब मानली जाते व ती प्रत्येकाला करावीच लागत असते. समाजात लग्न करताना वधू आणि वर दोघांचेही कुटुंब वधू आणि वराबरोबरच त्या कुटुंबांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती लक्षात घेतात. मात्र एखादे विवाह प्रमाणपत्र तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकते याची कधी कल्पना केली आहे का. आपल्याकडे अजूनही लग्न ही एक सामाजिक प्रतिष्ठेची बाब आहे. अजूनही समाजात मोठ्या प्रमाणात भेदभाव आणि विषमता आहे. या प्रश्वावर काम करण्यासाठीच केंद्र सरकारने एक योजना तयार केली आहे. समाजातील भेदभाव आणि विषमता दूर व्हाही हा सरकारचा हेतू आहे. या योजनेअंतर्गतच सरकार नवविवाहित जोडप्यांना 2.5 लाख रुपयांची मदत करते. अर्थात यासाठी लग्नाचे प्रमाणपत्र आणि इतर काही महत्त्वाची कागदपत्रे संबंधित शासकीय कार्यालयात जमा करावी लागतात. इथे लक्षात घ्यायची बाब म्हणजे ही 2.5 लाख रुपयांची मदत दोन हफ्त्यांमध्ये दिली जाते. या योजनेत अर्ज कुठे करायचा?, त्याचा लाभ कसा घ्यायचा?, त्याचा लाभ नेमका कोणाला मिळू शकतो? याबद्दल जाणून घेऊया.

कुठे आणि कसा अर्ज करायचा

– या योजनेचा लाभ तुम्ही तुमच्या मतदारसंघातील विद्यमान आमदार किंवा खासदार यांच्याद्वारे घेऊ शकता. हे आमदार किंवा खासदार तुमचा अर्ज डॉ. आंबेडकर फाउंडेशनला पाठवतील.

– त्याचबरोबर नियमानुसार तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठीचा अर्ज राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासनाकडेदेखील सुपूर्द करू शकता. तिथून हा अर्ज राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन, डॉ. आंबेडकर फाऊंडेशनकडे पाठवला जाईल.

योजनेचा लाभ कोणाला
या योजनेचा लाभ घेण्यासाठीची अट म्हणजे वधू आणि वर एकाच जातीतील नसावेत. म्हणजेच मुलगा जर सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्याचे लग्न दलित मुलीशी झालेले हवे. म्हणजे एकाच जातीतील वधू-वर नसावेत. त्याचबरोबर हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत विवाहाची नोंदणी केलेली असावी. इथे लक्षात घ्यायची महत्त्वाची बाब म्हणजे मुलाचे आधी लग्न झालेले नसावे. दुसरे लग्न करणार व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्याचबरोबर आणखी लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे जर तुम्ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल, तर ही रक्कम कमी केली जाईल. समजा तुम्हाला इतर कोणत्याही योजनेत 50,000 रुपये मिळाले असल्यास या योजनेची रक्कम देताना सरकार त्यातून 50,000 रुपयांची कपात करेल. त्यानंतर तुमच्या बँक खात्यात 2 लाख रुपये जमा केले जातील.

अर्ज करण्याची पद्धत-
या योजनेच्या अर्जासोबत नवविवाहित जोडप्याचे जात प्रमाणपत्र जोडावे लागेल.
त्याचबरोबर अर्जासोबत विवाह प्रमाणपत्रही जोडावे लागेल.
विवाहित असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.
पहिले लग्न असल्याचे सिद्ध करण्यासाठी एक महत्त्वाचे कागदपत्र जोडावे लागेल.
पती-पत्नीच्या उत्पन्नाचा दाखला
पैसे मिळण्यासाठी संयुक्त बॅंक खाते लागेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम