तलवार घेऊन मुंडकी छाटावी ; उदयनराजे भोसले संतापले !
दै. बातमीदार । २ डिसेंबर २०२२ । राज्यात महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे काही नेत्याच्या चांगलेच अंगलट आले असतांना सुद्धा आजही नेतेमंडळीकडून अपमान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलतांना उदयन राजे म्हणाले असं वाटतंय तलवार घेऊन एक-एकाची मुंडकी छाटून टाकावी असं आक्रमकपणे म्हणत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर तुम्ही सहन केलं असतं का ? शिवाजी महाराज नसते तर तुमचे आई-वडीलही नसते असे थेट सुनावत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. सातारा येथे उदयनराजे यांनी हे विधान केले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्यावर सगळे शांत बसले असले तरी मी शांत बसू शकत नाही. मी एक शिवभक्त आहे आणि त्या घराण्यात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करू शकत नाही असे म्हणत उदयनराजे पुन्हा एकदा आज भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. सातारा येथे माध्यमांशी बोलत असतांना उदयनराजे यावेळी भडकल्याचे देखील पाहायला मिळाले. मी लढणारा आहे, मी रडणारा नाही, मी त्या दिवशी भावुक झालो होतो, शिवाजी महाराजांचा अवमान होता कामा नये नाहीतर नावच पुसून टाका म्हंटल्यावर मी भावुक झाल्याचे उदयनराजे यांनी म्हंटले आहे.
याशिवाय मी आज रायगडला जाणार आहे. उड्या शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी जाऊन माझी भावना व्यक्त करणार आहे. त्यावेळी तिथं सगळंच बोलतो असा इशारा देखील उदयनराजे यांनी दिला आहे. वारंवार महाराजांचा होणारा अपमान, त्याला होणाऱ्या समर्थनावर उदयनराजे यांनी स्पष्टच सुनावलं आहे. लोकं कोडगी झाली आहेत. सोईप्रमाणे होणारा वापर हे चालणार नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपप्रवक्ते त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधाने केली आहे. एकूणच उदयनराजे यांनी रायगड येथे जाऊन आपली व्यथा मांडणार असल्याचे जाहीर केले असले तरी दुसरीकडे असं वाटतंय एक-एकाची मुंडकी छाटावी असं म्हंटलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम