मोठी बातमी : मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड !
दै. बातमीदार । १३ मे २०२३ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर जात असताना अचानक त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आहे. शिंदे हे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा आणि पाटण येथे जात असतान ही घटना घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, मुंबईतील राजभवनावरून ते सातारा-पाटण येथे जात कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या त्यांचा सातारा-पाटण दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आले असल्याची माहिती आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम