पुढील महिन्यात ‘या’ कंपनीची दमदार चारचाकी येणार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ ऑक्टोबर २०२२ । तुम्हाला जर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेबर मध्ये अनेक कार कंपन्या नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तुम्हाला कार खरेदी करताना आणखी पर्याय उपलब्ध होतील. चला तर, जाणून घेऊयात पुढील महिन्यात कोणकोणत्या कंपन्या नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

एमजी मोटर कंपनी या वर्षी भारतात नवीन जनरेशन हेक्टर एसयूव्ही लाँच करणार आहे. कंपनीनं ही कार लाँच करण्यापूर्वीच गाडीची अनेक फीचर्स शेअर केलीत. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात ही कार लाँच केली जाईल. नवीन एमजी हेक्टरमध्ये सर्वांत मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीनसुद्धा असेल. दुसरीकडे, 5 वी जनरेशन जीप ग्रँड चेरोकीसुद्धा पुढील महिन्यात लाँच होईल. ती भारतात असेंबल केली गेली आहे. जीप इंडियानं याआधीच या मॉडेलचा टीझर रिलीज केला आहे. जागतिक स्तरावर, ग्रँड चेरोकी 5.7 लिटर व्ही 8 इंजिनसह येते. यात 2 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 3.6 लिटर व्ही 6 पेट्रोल इंजिनचा पर्यायदेखील मिळतो.

चिनी ईव्ही निर्माता बीवायडी (BYD) ने त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो 3 लाँच करून भारतीय वाहन बाजारात प्रवेश करण्याची घोषणा केलीय. या गाडीचं बुकिंग आधीच सुरू झालंय. या गाडीची डिलिव्हरी पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होईल. बीवायडी नोव्हेंबरच्या अखेरीस अधिकृतपणे या नव्या कारची किंमत जाहीर करू शकते. याशिवाय, टोयोटा मोटर त्यांची लोकप्रिय एमपीव्ही इनोव्हा हायब्रिड प्रकारात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीनं या पूर्वीची अर्बन क्रूझर हायरायडर एसयूव्हीदेखील लाँच केली होती. रिपोर्ट्सनुसार, इनोव्हा हायक्रॉस मजबूत हायब्रीड प्रकारासह पुढील महिन्यात लाँच केली जाऊ शकते. या एमपीव्हीची नुकतीच रस्त्यावर टेस्ट घेण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला मारुती सुझुकीनं नवीन जनरेशन बलेनो लाँच केल्यानंतर आता ही कंपनी प्रीमियम हॅचबॅक सीएनजी प्रकारांमध्येदेखील लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र, याबाबत कंपनीनं अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. बलेनो सीएनजीबाबत काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ती एकदा लाँच झाल्यानंतर मारुती कंपनीच्या इतर कारच्या यादीमध्ये तिचा समावेश होईल. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात तुम्ही जर नवीन कार घेण्याचा विचार करीत असाल, तर बाजारात लाँच होणाऱ्या या कार तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम