नितीन देसाईंच्या पार्थिवाचं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी घेतले अत्यंदर्शन !
बातमीदार | ४ ऑगस्ट २०२३ प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी दोन दिवसापूर्वी आपल्या एन.डी स्टुडिओत गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर राज्यातील अनेक चाहत्यांना मोठा हादरा बसला होता. आज नितीन देसाईंच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलं. त्यांच्यासोबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही आज सकाळी मुंबईतील जेजे रुग्णालयात जाऊन दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. नितीन देसाईंची मुले आज अमेरिकेतून परतणार आहेत. यानंतर त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता त्यांच्या एन.डी स्टुडिओत अंत्यसंस्कार पार पडतील.
प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुपारी ४ वाजता त्यांच्या एन.डी स्टुडिओत हे अंत्यसंस्कार पार पडतील. तर दुपारी १२ ते २ या काळात त्यांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. दरम्यान देशाई यांच्या अंत्यदर्शनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले असून थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम