नितीन गडकरींची तब्येत बिघडली !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये सरकारी योजनांचं उद्घाटन करण्यासाठी नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी सिलीगुडीमध्ये 1206 कोटी रुपये खर्चाच्या 3 NH प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हा कार्यक्रम सुरु असतानाच नितीन गडकरी यांची प्रकृती अचानक बिघडली.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची तब्येत एका कार्यक्रमादरम्यान अचानक बिघडली. पश्चिम बंगालमधील सिलीगुडी इथल्या डागापूरमधील कार्यक्रमाला नितीन गडकरी उपस्थित होते. परंतु कार्यक्रमादरम्यानच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर जवळच्या रुग्णालयाचं पथक कार्यक्रमस्थळी पोहोचलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
यानंतर सुकना इथलं प्राथमिक आरोग्य केंद्राचं पथक पोहोचलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांची प्रकृती खालावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर 2018 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली होती. गडकरी मंचावरच बेशुद्ध पडले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित होते. राज्यपालांनीच त्यांना मंचावर आधार दिला. यानंतर नितीन गडकरी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम