कोणीही मुस्लिम यंदा ची ईद स्वेचेन व आनंदाने साजरी करणार नसून त्यांच्या मनात शल्य – फारूक शेख

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ११ एप्रिल २०२४ | संपूर्ण भारतात ११ एप्रिल रोजी रमजान ईद साजरी होत असली तरी मागील सहा महिन्यापासून इस्राईल ने गाजा वर युद्ध लादून हजारो मूळ,वृद्ध,महिलांचे जीव घेतले असून वस्त्या उद्ध्वस्त केल्या असल्याने कोणीही मुस्लिम यंदा ची ईद स्वेचेन व आनंदाने साजरी करणार नसून त्यांच्या मनात शल्य आहे.

रमझान ईद च्या पूर्व संध्येला जळगाव जिल्हा मणियार बिरादरी चे अध्यक्ष फारूक शेख यांनी अत्यंत दुःखाने ने रमजान ईदच्या शुभेच्या देताना आपल्या अश्रुला वाट करून देताना त्यांनी उपस्थितांना सांगितले की, ईदच्या निमित्ताने गाझामध्ये इस्रायलकडून करण्यात येत असलेली क्रूर कारवाई आपण विसरू शकत नाही. हजारो लोकांना विनाकारण हौतात्म्य पाजले जात आहे. लाखो लोक बेघर होत आहेत. भुकेले, तहानलेले आणि असहाय पॅलेस्टिनी पाहून दगडाची मनेही वितळतात.

आमच्या पॅलेस्टिनी बांधवांच्या असहायतेमुळे ईदचा आनंद खूप कमी झाला आहे. आमचा किब्ला-ए-अवल बैतुल मकदस (मस्जिद ए अक्सा )अजूनही इस्राईल लोकांच्या ताब्यात आहे.

ईदच्या या प्रसंगी, आम्ही प्रार्थना करतो की अल्लाह रब्बुल इज्जतने त्यांचे प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या दानधर्मात बैतुल
मकदसला (मस्जिद ए अक्सा) ला जुलमींच्या तावडीतून मुक्त करावे. आमच्या पॅलेस्टिनी बंधू-भगिनींवरील अत्याचारांचा अंत होवो आणि त्यांना आनंदी आयुष्य देवो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम