नोकियाची वाटचाल खडतर : हजारो कर्मचाऱ्याना देणार नारळ !

बातमी शेअर करा...

गेल्या अनेक वर्षापूर्वी मोबाईल बाजारपेठेवर अधिराज्य गाजवणाऱ्या फिनलँडमधील नोकिया या आघाडीच्या कंपनीची सध्या आर्थिक वाटचाल खडतर झाली आहे. एकेकाळी जगातील सर्वात मोठी कंपनी मानल्या जाणाऱ्या नोकियाने व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे कारण देत टाळेबंदीची तयारी केली आहे. नोकियाने सुमारे १४,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी केली आहे. कंपनीच्या जगभरातील कार्यालयांमधून ही नोकर कपात केली जाणार आहे.

तिसऱ्या तिमाहीतील विक्री आणि नफ्यात घट झाल्यानंतर खर्चात कपात करण्यासाठी जगभरातील १४ हजार कर्मचारी किंवा कर्मचारी संख्याबळाच्या तुलनेत १६ टक्के कर्मचारी कपात करण्याची योजना आखत आहे. बाजारातील सध्याचे अनिश्चिततेचे वातावरण लक्षात घेऊन खर्च कमी करणे आणि कामकाजात्मक कार्यक्षमता सुधारणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीने म्हटले आहे. नोकिया २०२६ पर्यंत १.२ अब्ज युरो वाचवण्याची तयारी करत आहे. या कालावधीत कामकाज खर्च १४ टक्क्यांनी कमी करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सध्या कंपनीत सुमारे ८६ हजार कर्मचारी काम करतात, ते ७२ हजारांवर कमी केले जाणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम